तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा
जमाखर्च एकदा पाहून जा
तू मला दिलेलं घेउन जा
मी तुला दिलेलं देउन जा
स्वीट होममध्ये कित्येकदा खाल्ले
आपण कचोरी सामोसे
आत्ता पर्यंत नेहमी मीच भरत आलो
बिलाचे सर्व पैसे
आज अखेरचं जाऊ, पोटभर कचोरी खाऊ
किमान या बिलाचे पैसे तरी भरून जा
लेक्चर बुडवून मी फर्स्ट शोचं
ऍडव्हान्स बुकिंग करायचो
अन आठवड्यात एक तरी
नाटक किंवा सिनेमा दाखवायचो
नाटकाचे माफ करतो
मात्र सिनेमाच्या तिकिटाचे पैसे देउन जा
आपलं हे प्रेम प्रकरण
तुझ्या पैलवान भावाला कळलं जेव्हा
एवढं बेदम ठोकलं मला
मी मरता मरता वाचलो तेव्हा
चार दिवस दवाखान्यात, पंधरा दिवस अंथरुणात पडून होतो
भावाच्या वतीने तू माझी माफी मागून जा
मी कुठून तरी नोट्स मिळवायचो
परीक्षेच्या काळात मात्र तुला द्यायचो
मग तुला नेहमी फर्स्टक्लास मिळायचा
माझा मात्र एक तरी बॅकलॉग राहायचा
आता मात्र ऑल क्लीअर व्हायला हवं
म्हणूनच माझ्या नोट्स मला परत देउन जा
Recent comments
6 weeks 13 hours ago
21 weeks 4 days ago
33 weeks 4 days ago
37 weeks 4 days ago
46 weeks 4 days ago
1 year 3 weeks ago
1 year 16 weeks ago
1 year 17 weeks ago
1 year 19 weeks ago
1 year 22 weeks ago