Drupal Association Member
FSF Member
आजच्या दिवशी, १८ वर्षांपूर्वी मी नोकरी करायला सुरुवात केली. अंदाजे अजून १८ वर्षांनी मी नोकरी बंद करीन, म्हणजे आयुष्याचे निम्मे अंतर मी गाठले आहे असे म्हणायला हरकत नाही. माझ्या १८ वर्षांच्या नोकरीत मी काय शिकलो, माझ्या विचारात कसे कसे बदल होत गेले याचा हा आढावा.
२८ ऑक्टोबरला मी L&T कंपनीमध्ये नोकरी सुरू केली Graduate Engineer Trainee (G.E.T.) म्हणून. सुरुवातीचा १ महिना आरामच होता. नंतर आम्ही १ महिना अवारपूर इथे ट्रेनिंगसाठी गेलो.
एकदा मला नरीमन पौइंटहून पवईला जायचे होते. मी आपला सवयीप्रमाणे २nd class रेल्वेने अंधेरीला गेलो आणि तिकडून रिक्षाने पवईला गेलो. एक्स्पेन्स रिपोर्टमध्ये मी रेल्वेचे २nd class चे पैसे लावले, तर मला माझ्या boss ने किंवा अकौंट्सच्या बाईने सांगितलं पण नाही की मी १ st class ने जाउ शकतो म्हणून. बोलता-बोलता माझा मित्र म्हणाला की आपल्याला फर्स्ट क्लासने जायला अलाऊड आहे. तेव्हा मी पहिला धडा शिकलो की नेहमी आपले बेनिफिट्स काय आहेत ते माहीत करून घ्या.
मला L&T मध्ये कंटाळा आला तेव्हा मी दुसरीकडे नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. पण हाती यश येत न्हवते. Siemens मध्ये इंटरव्हूसाठी मला ३-४ वेळा बोलावले. तेच तेच प्रश्न दरवेळी वेगवेगळे लोक विचारायचे. दर वेळी मला सुट्टी काढून जावे लागायचे. शेवटी म्हणाले की तुम्ही चांगले कॅन्डिडेट आहात पण L&T चा पगार परवडत नाही. आता माझा पगार किती आहे ते त्यांना आधीच माहीत होते की, मग उगीच नाटक कशाला? एकदा तर अंगात खूप ताप असतानासुद्धा मी रोजमाउंट कंपनीत नवी मुंबईला इंटरव्हूसाठी गेलो होतो. यातून शिकलेला धडा म्हणजे गरजवंताला अक्कल नसते. पोट भरायचे असेल तर कष्ट करावे लागतात, अपमान सहन करावा लागतो. पण आपण जेव्हा मजबूर असतो तेव्हा आपल्याला काही इलाज नसतो.
नंतर एकदा नशीबाने मी पेपरमध्ये वाचले की SEEPZ मध्ये एका कंपनीत walk-in interview आहेत. मी शनिवारी SEEPZ मध्ये गेलो. रिसेप्शनिस्टने सांगितला रेझुमे द्या, आम्ही तुम्हाला कॉल करतो. आता मला चांगलेच माहीत होते की असा कोणी कॉल करत नाही. मी म्हणालो की मला कमीत कमी लेखी परीक्षा तरी घेऊ दे. नशिबाने कंपनीचा कोणी तरी म्हणाला की ठीक आहे, लेखी परीक्षा द्या. मी written test मध्ये पहिला आलो म्हणून लगेच interview ला बोलावलं. मी २ interview पास झालो तेव्हा CEO ने मला बोलावलं आणी ४० टक्के कमी पगार देऊ केला. But he was very nice and promised me that I will be making as much as I did in L&T within a year. मी पुढेमागे विचार न करता ती नोकरी accept केली. यातून शिकलेला धडा म्हणजे कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी २ पावले मागे टाकावी लागतात. Also learned that "Never under-estimate importance of luck in your life." A lot of successful people fail to recognize (or at least, do not acknowledge) the importance of luck in their life.
अश्या प्रकारे IT क्षेत्रात आल्यावर मी प्रोग्रामिंग शिकलो. २ वर्षांनी अमेरिकेला जायची संधी आली तेव्हा माझ्या टीममधील दुसऱ्या कलीगला पाठवला. कारण सांगितलं की तो ग्रूपमध्ये सिनियर आहे (३ आठवड्यानी सिनियर होता, पण कंपनीमध्ये मी त्याच्यापेक्षा सिनियर होतो.) २ महिन्यानंतर अजून एकाला पाठवला तेव्हा सांगितलं की त्याला या प्रोजेक्टवर स्पेशल नौलेज आहे, जे तुला नाही. पण तुझा पण नंबर लागेल. मी लगेच दुसरी नोकरी शोधायला लागलो आणी ३ महिन्यात अमेरिकेला आलो. यातून शिकलेला धडा म्हणजे कंपनीकडे चिक्कार कारणे असतात. तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे.
अमेरिकेत आल्यावर कळले की इथे नोकरीवर ठेवताना किंवा काढून टाकताना दयामाया हा प्रकार नसतो. गंमत म्हणजे मी आज हे टाईप करतानाच समजले की आज इथून बऱयाच जणांना हाकलण्यात आले आहे. यातून शिकलेला धडा म्हणजे कधीही नोकरीवर प्रेम करू नका. धंदे मे कोई किसीका भाई नही, कोई किसीका बेटा नही. कंपनी जर आपल्याला लाथ मारू शकते तर आपण सुद्धा त्यांना लाथ मारायची तयारी ठेवली पाहिजे.
जमलं तर मॅनेजमेंटचे धडे पण वाचा.
Recent comments
6 weeks 13 hours ago
21 weeks 4 days ago
33 weeks 4 days ago
37 weeks 4 days ago
46 weeks 4 days ago
1 year 3 weeks ago
1 year 16 weeks ago
1 year 17 weeks ago
1 year 19 weeks ago
1 year 22 weeks ago