मनातलं

माझे विचार

आजचा दिवस

आजच्या दिवशी, १८ वर्षांपूर्वी मी नोकरी करायला सुरुवात केली. अंदाजे अजून १८ वर्षांनी मी नोकरी बंद करीन, म्हणजे आयुष्याचे निम्मे अंतर मी गाठले आहे असे म्हणायला हरकत नाही. माझ्या १८ वर्षांच्या नोकरीत मी काय शिकलो, माझ्या विचारात कसे कसे बदल होत गेले याचा हा आढावा.
 
२८ ऑक्टोबरला मी L&T कंपनीमध्ये नोकरी सुरू केली Graduate Engineer Trainee (G.E.T.) म्हणून. सुरुवातीचा  १ महिना आरामच होता. नंतर आम्ही १ महिना अवारपूर इथे ट्रेनिंगसाठी गेलो.
 

रिस्क मैनेजमेन्ट

सध्या परिस्थिती अतिशय बिकट आहे. कधीही कोणाचीही नोकरी जाऊ शकते. तसं  म्हटलं तर अमेरिकेत ही स्थिति खूप पूर्वीपासूनच आहे. भारतात असा अनुभव फार लोकाना येत नसे म्हणून स्थिति इतकी गंभीर न्हवती, हाच काय तो फरक. मी लार्सेन एंड टुब्रो कंपनीत काम करत होतो त्यानंतर काही वर्षातच माझ्याच डिपार्टमेन्ट मध्ये खूप लोकाना हाकलण्यात आले, हे माझ्या बघण्यात आहे. माझ्या नशीबाने फार पूर्वीच सावध करण्यात आले होते, म्हणून मी वाचलो.

पुण्याच्या बँकेतील अनुभव

माझे शिक्षण पुण्यात झाले तेव्हा आलेला एक अनुभव.

मी इंजीनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहात होतो तेव्हा आमची खानावळ होती, तिचे नाव F Club. तिथे काम करायला विठृ्लराव होते. ते दर महिन्याला आम्हाला बिल द्यायचे आणी ते एका बँकेत भरावे लागायचे. ती बैंक जंगली महाराज रोड वर होती. (आता नाव विसरलो.) तिथे काम करणारा कॅशियर एकदम उद्धट होता, पण महिन्यातून एकदाच त्या बँकेत जाणे होत असे, त्यामुळे मला कधी फारसा त्रास झाला नही. पण एकदा मात्र तशी वेळ आली.

Syndicate content